प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना व लॉकडाऊन काळातील महासंकटातही रुग्णांची सदैव सेवा करणारे डॉ. अशोक सखदेव यांचा बेळगाववासीय आणि वकिलांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कोरोना काळातही डॉ. सखदेव यांनी लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करत आपली सेवा सुरू ठेवली आहे. तसेच डॉ. सखदेव यांच्या वैद्यकीय सेवेबद्दल यापूर्वी त्यांना बेळगाव भूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
बेळगाव वकील संघाचे उपाध्यक्ष ऍड. गजानन पाटील, ऍड. आण्णासाहेब घोरपडे, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, ऍड. वाय. के. दिवटे, ऍड. बी. पी. जेवणी, ऍड. शरद देसाई, प्रशांत भातकांडे, ऍड. उमेश बिडीकर, डॉ. नितीन सखदेव व सुरेश गावडे उपस्थित होते.