आणखी 166 पॉझिटिव्ह : 641 अहवाल प्रतीक्षेत : चौघांचा मृत्यू : कोरोना बाधित रुग्णसंख्या 2886
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांचा आलेख उंचावतच चालला असून रुग्णांची संख्या तीन हजाराच्या घरात पोहोचली आहे. गुरुवारी नव्याने 166 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर चौघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. गणेशोत्सव झाल्यावर कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा असताना याच महिन्यात गेल्या 17 दिवसांत 1 हजार 528 रुग्ण आढळले, तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजून 641 कोरोना नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
ऑगस्ट अखेरपर्यंत 1 हजार 358 रुग्ण होते. तर सप्टेंबरच्या सतरा दिवसांत ही संख्या 2 हजात 886 झाली आहे. म्हणजेच 1 हजार 528 रुग्ण सतरा दिवसांत वाढले आहेत. तसेच ऑगस्ट अखेरपर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला होता. 17 दिवसात आणखी 31 जणांचा मृत्यू होऊन एकूण 54 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
आणखी 166 पॉझिटिव्ह रुग्ण
जिल्हय़ात गुरुवारी नव्याने 166 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 2,886 एवढी झाली आहे. गुरुवारी आणखी चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या 54 झाली आहे. तसेच नव्याने चौघांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 1 हजार 536 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात कोरोना सक्रिय 1 हजार 296 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
641 कोरोना नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अजूनही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत अजून 641 कोरोना नमुना चाचण्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ही संख्या मोठी असल्याने कोरोना रुग्ण सुद्धा वाढण्याची शक्मयता आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 21523
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 2886
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 17996
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 641
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 1296
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 54
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 1536
गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 8660
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12646