ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उबर कंपनीकडून नुकतीच एक घोषणा करण्यात आली आहे. करोना व्हायरसचे पीडित असल्यास आपल्या चालकांना नुकसान भरपाई देणार आहे.
या घोषणेनुसार ज्या चालकांनी किंवा करोना व्हायरस ग्रस्त असल्याचे दाखवल्यास किंवा ज्यांना आरोग्य अधिकाऱयांनी वॉर्डमध्ये ठेवलेले असल्यास उबर त्यांना 14 दिवसांची नुकसान भरपाई देणार आहे.
उबरच्या एका प्रवक्त्याने माहिती देताना सांगितले की, ही नुकसान भरपाई काही ठिकाणी लागू करण्यात आली आहे. तसेच हे जगभरात लागू करणार आहोत.
दरम्यान, जगभरात आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. 3300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चीन नंतर आता इटलीतील परिस्थिती बिघडली आहे. चीनमध्ये 80700 जणांना याची लागण झाली आहे.