प्रतिनिधी/ पणजी
राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढतच असून काल बुधवारी तब्बल 497 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर 287 जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. सक्रीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3351 वर पोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या 165 एवढी झाली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून ही अत्यंत धोकादायक बाब ठरली आहे. मडगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 497 झाली असून मडगाव सध्या कोरोना हॉटस्पॉट ठरला आहे. वास्कोची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 258 झाली आहे. फोंडा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 224 झाली आहे. पणजी शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 163 तर म्हापसा येथील रुग्णसंख्या 146 झाली आहे. डिचोली आणि सत्तरी तालुक्यातही आता रुग्णसंख्या वाढत आहे.
डिचोली 36, सांखळी 94, पेडणे 96, वाळपई 97, हळदोणा 75, बेतकी 75, कांदोळी 60, कासारवर्णे 38, कोलवाळ 111, खोर्ली 114, चिंबल 121, शिवोली 60, पर्वरी 172, मये 32, कुडचडे 97, काणकोण 46, बाळ्ळी 28, कासावली 110, चिंचिणी 37, कुठ्ठाळी 51, कुडतरी 80, लोटली 50, मडकई 48, केपे 93, सांगे 39, शिरोडा 61, धारबांदोडा 38 तर नावेलीची रुग्णसंख्या 105 एवढी झाली आहे.