- गुरुवारी 111 मृत्यू; 35,952 नवे रुग्ण
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. राज्यातील रुग्णांनी 26 लाखांचा टप्पा पार केला आहे. बुधवारी राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ झाली. मागील 24 तासात 35,952 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. तर 111 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 26 लाख 00 हजार 833 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 53 हजार 795 एवढा आहेे.
कालच्या एका दिवसात 20,444 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 22 लाख 83 हजार 037 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.78 % आहे. तर मृत्युदर 2.07 % आहे. सद्य स्थितीत राज्यात 2 लाख 62 हजार 685 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 88 लाख 78 हजार 754 नमुन्यांपैकी 13.78 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 13 लाख 62 हजार 899 क्वारंटाईनमध्ये असून, 13 हजार 770 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.