- रुग्णसंख्येने पार केला 9 लाखांचा टप्पा
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतच आहे. राज्यातील रुग्ण संख्येने 9 लाखांचा टप्पा गाठला आहे. मागील 24 तासात आता पर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 23,350 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 328 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 9 लाख 07 हजार 212 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 26 हजार 604 एवढा आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
रविवारी दिवसभरात 7,826 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 6 लाख 44 हजार 400 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 लाख 35 हजार 857 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 72.3 % आहे. तर मृत्यू दर 2.93 % इतका आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 46 लाख 47 हजार 742 नमुन्यांपैकी 9 लाख 07 हजार 212 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14 लाख 96 हजार 072 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 38 हजार 509 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- मुंबई, पुण्यातील परिस्थिती गंभीर
रविवारी मुंबईत 1,910 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. परिणामी बाधितांची संख्या 1,55,622 वर पोहोचली असून बळींची संख्या 7,869 आहे. सद्य स्थितीत 23,939 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर पुण्यात आतापर्यंत 1 लाख 99 हजार 303 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून आतापर्यंत 4,429 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 1 लाख 33 हजार 441 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत 61 हजार 383 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.