प्रतिनिधी/ पणजी
राज्यात शनिवारी कोरोनामुळे कुणीही दगावला नाही. त्यामुळे बळींची संख्या 686 वर स्थिर राहिली. गत 24 तासात 198 नवे रुग्ण सापडले तर 163 जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.73 टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या 1348 सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत एकूण 47689 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 45655 जण बरे झाले. संशयित रुग्ण म्हणून 48 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले आहे. 109 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे : डिचोली 21, सांखळी 33, पेडणे 32, वाळपई 16, म्हापसा 43, पणजी 85, हळदोणा 22, बेतकी 23, कांदोळी 84, कासारवर्णे 5, कोलवाळ 19, खोर्ली 34, चिंबल 76, शिवोली 48, पर्वरी 107, मये 17, कुडचडे 15, काणकोण 29, मडगाव 117, वास्को 66, बाळ्ळी 13, कासावली 46, चिंचिणी 29, कुठ्ठाळी 59, कुडतरी 35, लोटली 43, मडकई 26, केपे 26, सांगे 8, शिरोडा 22, धारबांदोडा 12, फोंडा 105, नावेली 28. त्याशिवाय हवाईमार्गे आलेले 4 बाधित सापडले आहेत.