ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारने राज्यात 30 एप्रिल पर्यंत नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. दरम्यान, काल राज्यात 7 हजारच्यावर रुग्ण आढळून आले तर बाधितांनी 6.98 लाखांचा टप्पा पार केला आहे.
गुरुवारी तब्बल 7,437 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 24 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 98 हजार 005 वर पोहचली आहे. यामधील 23 हजार 181 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 3,687 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 63 हजार 667 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 11,157 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 52 लाख 57 हजार 183 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 52,696 आरटीपीसीआर टेस्ट आणि 39,074 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.