- 82,343 रुग्णांवर उपचार सुरू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा उच्चांकी संख्या गाठली आहे. मागील 24 तासात 9 हजार 855 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 42 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 21 लाख 79 हजार 185 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 52 हजार 226 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 6,559 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 20 लाख 43 हजार 349 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 82 हजार 343 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.77 % तर मृत्युदर 2.41 इतका आहे.
- मुंबईत 1,121 नवे रुग्ण
मुंबईत कालच्या दिवसात 1,121 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 6 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 734 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,28,740 वर पोहचली आहे. तर 3,06,373 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,482 इतकी आहे. सद्य स्थितीत 10 हजार 010 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.