ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशातील रुग्ण संख्येत आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासात 7 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1 लाख 65 हजार 799 वर पोहचली असून, मृतांची संख्या 4 हजार 706 इतकी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशात 89 हजार 987 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 71 हजार 105 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्याच्या स्थितीला कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत तब्बल 17 लाख 68 हजार 461 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर ब्राझील, स्पेन, रशिया, युके, इटली, फ्रान्स, जर्मनी हे देश अनुक्रमे आहेत. चीन 15 व्या क्रमांकावर असून तुर्की आणि इराणी या देशांना भारताने नुकतेच मागे टाकले आहे.