ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 341 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर 2 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 15 हजार 294 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 156 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 15,294 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 1639 पोलीस अधिकारी आणि 13,655 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 12 हजार 306 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1247 पोलीस अधिकारी आणि 11,059 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 2832 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 377 पोलीस अधिकारी आणि 2455 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 156 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 15 पोलीस ऑफिसर आणि 141 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.