ऑनलाईन टीम / लेह :
देशात कोरोनाचा कहर वेगाने वाढत आहे. त्यातच लेहमध्ये देखील रुग्णांची संख्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर लेहमध्ये 7 जून पर्यंत कोरोना कर्फ्यू वाढविण्यात आला आहे.
जिल्हा आपदा प्रबंधन प्राधिकरण लेहच्या अध्यक्षांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता सध्या चालू असलेला कर्फ्यू 24 मे च्या 7 वाजल्यापासून 7 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कायम असणार आहे. प्रशासनाने सांगितले की, लेहमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसत आहे, पॉझिटिव्ह रेट देखील वाढत आहे. तसेच रुग्णालयात देखील रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
लेहचे जिल्हाधिकारी श्रीकांत सुसे यांनी आपल्या कार्यालयाला सांगितले की, नागरिकांना ये जा करण्यासाठी दिले जाणारे पासेसची सुविधा तात्काळ बंद करण्यात यावी.
निर्बंध :
- आजपासून सर्व सरकारी कार्यालयात आम जनतेसाठी बंद असणार आहेत.
- शनिवार – रविवार सर्व व्यवहार पूर्णपणे बंद असतील.
- बँक, विश्व विद्यालय, एअरपोर्ट किंवा कोणत्याही स्वयक्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सकाळी 9 ते 10.30 पर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 5.30 या वेळेतच कार्यालयात ये – जा करण्यासाठी परवानगी असेल.
- बाहेरील राज्यातून येणाऱ्या सर्व वाहनांना कोविड एसओपीच्या नियमानुसार परवानगी दिली जाईल.
दरम्यान, शुक्रवारी लडाखमध्ये 121 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. 110 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्य स्थितीत लदाखहमध्ये 1,599 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत प्रदेशात 15,374 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 171 जणांनी आपला जीव गमावला आहे.