ऑनलाइन टीम / लंडन :
जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाचा फटका आता विम्बल्डनलाही बसला आहे. टेनिस जगातील मानाची विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. सध्या ची परिस्थिती पाहता आयोजकांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे ही स्पर्धा दुसऱ्या महायद्धानंतर पहिल्यांदा च रद्द होत आहे. यंदा ही स्पर्धा 28 जून ते 11 जुलै दरम्यान होणार होती. मात्र, युरोपला कोरोना चा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, आता पुढची विम्बल्डन स्पर्धा 2021 मध्ये 28 जून ते 11 जुलै या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. विम्बल्डन रद्द झाल्यामुळे आता अमेरिकन ओपन आणि फ्रेंच ओपन या दोनच स्पर्धा टेनिस प्रेमींना सप्टेंबर मध्ये अनुभवता येणार आहेत.