उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारचा निर्णय
ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेश सरकारनेही कोरोना व्हायरस एक साथीचा रोग म्हणून जाहीर केला आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये 22 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लखनऊ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अधिकाऱयांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये 22 मार्च पर्यंत बंद राहतील. सध्या राज्यात कोरोना व्हायरसचे 11 रूग्ण आढळून आले आहेत. यातील 10 जणांवर दिल्लीमध्ये व एका रूग्णावर लखनऊतील किंग जॉर्ज मेडिकल युनिवर्सिटीमध्ये उपचार सुरु आहेत.
दरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत, तसेच सर्व मेडीकल कॉलेजमध्ये आयसोलेशन वार्ड तयार करण्याच्या सूचनाही अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत.