- मुंबईत दिवसभरात तब्बल 9,990 नवे रुग्ण , 27 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईमध्ये तर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 9,990 नवे रुग्ण आढळले तर 27 रुग्णांचा मृत्यू झाला. दैनंदिन रुग्णांची संख्या 10 हजारच्या उंबरठ्यावर पोहोचली असून रुग्ण दुपटीचा कालावधी 44 दिवसांपर्यंत खाली गेला आहे.
मागील 24 तासात मुंबईत 5,322 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 लाख 66 हजार 365 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 62 हजार 187 रुग्ण उपचार घेत आहेत.
- पुण्यात 39,518 ॲक्टिव्ह रुग्ण
मागील 24 तासात पुण्यात तब्बल 5,720 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर पुण्यात 44 जणांचा तर पुण्याबाहेरील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 3,293 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण संख्या 2,83,819 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 2,38,890 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सद्य स्थितीत 39,518 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 837 जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर आता पर्यंत 5,411 जणांनी आपला जीव गमावला आहे.