प्रतिनिधी/ पणजी
रविवारी कोरोनाचा एक बळी गेला असून 112 नवे बाधित सापडले आहेत. तर 131 जण बरे होऊन घरी परतले. सध्या 1364 जण सक्रिय कोरोना रुग्ण असून संशयित म्हणून 36 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले आहे. तर 42 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. आता पर्यंत मिळून एकूण 48686 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 46624 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. डिचोली – 38, सांखळी – 23, पेडणे – 20, वाळपई – 25, म्हापसा – 60, पणजी – 82, हळदोणा – 26, बेतकी – 40, कांदोळी – 79, कासारवर्णे – 6, कोलवाळ – 09, खोर्ली – 30, चिंबल – 53, शिवोली – 49, पर्वरी – 111, मये – 5, कुडचडे – 19, काणकोण – 35, मडगांव – 132, वास्को – 68, बाळ्ळी – 14, कासावली – 48, चिंचिणी – 42, कुठ्ठाळी – 46, कुडतरी – 26, लोटली – 49, मडकई – 30, केपे – 38, सांगे – 08, शिरोडा – 21, धारबांदोडा – 20, फोंडा – 74, नावेली – 28.