डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील समितीत 13 सदस्यांचा समावेश
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारला सल्ले देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये बेंगळूरच्या निम्हान्स इस्पितळाचे संचालक सतीश गिरीमाजी, इंदिरा गांधी बालरोग संस्थेचे अधीक्षक व तज्ञ डॉ. बसवराज जे. व्ही., डब्ल्यूएचओचे बेंगळूर डिव्हिजन टीम लिडर डॉ. आशिष सत्यपती यांच्यासह 13 जणांचा समावेश आहे.
या समितीमध्ये बेंगळूरच्या एचसीजी इस्पितळाचे डॉ. अजयकुमार, क्लाऊड नाईन बालरोग इस्पितळाचे डॉ. अरविंद शेणॉय, सागर इस्पितळाचे डॉ. रघुनाथ यु., मणिपाल इस्पितळाचे डॉ. जगदीश चिन्नप्पा, बळ्ळारीतील बालरोग तज्ञ डॉ. योगानंद रेड्डी, ऍस्टर इस्पितळाचे डॉ. श्रीकांत जेटी, हुबळीतील किम्सचे प्रा. डॉ. विनोद रटगेरी, सेंट जॉन इस्पितळाचे डॉ. प्रेम के. मुनी आणि सदस्य सचिव म्हणून वैद्यकीय शिक्षण खात्याचे सचिव डॉ. पी. जी. गिरीश यांचा समावेशही करण्यात आला आहे.
तिसऱया टप्प्यातील कोरोनाची लाट मुलांना धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर ही समिती अध्ययन करून राज्य सरकारकडे अहवाल सादर करणार आहे. तसेच राज्य सरकारला आवश्यक उपाययोजनांसंबंधी सल्लेही देणार आहे.