ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसची झळ जगातील तेल बाजारालाही बसल्याचे दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपाचा चीनमधील विमानसेवालाही फटका बसला असून, जगातील तेल उत्पादक देशही उत्पादन कमी करण्याचा विचार करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
कोरोनाच्या दहशतीमुळे चीनमधील रस्त्यांवरची गर्दी गायब झाली आहे. जनसंख्येच्या एक मोठा भाग आपल्या घरातच अडकून पडला आहे. सर्व विमान कंपन्यांनी आपल्या विमानसेवाही स्थगित केल्या असून, बाजारपेठाही बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे इंधनाचा वापरही कमी झाला आहे. स्वाभाविकच तेल उत्पादक देश आपले तेल उत्पादन कमी करतील, अशी परिस्थिती दिसत आहे.