बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके विलगीकरणात गेले आहेत. कोरोनाची लक्षणे आढळल्याने आवश्यक चाचण्या करून घेऊन त्यांनी औषधोपचार सुरू केले आहेत. कुटुंबीय आणि जनता यांच्याशी संपर्क येऊ नये म्हणून आपण विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला असून काल जन्मदिनीही कुणाच्या संपर्कात आलेलो नाही. अशी माहिती आमदार बेनके यांनी तरुण भारत शी बोलताना दिली आहे.
शुक्रवार दि १० पासून त्यांची तब्येत बिघडली होती. ताप व इतर लक्षणे आढळून आल्याने शनिवारपासूनच उपचार व चाचण्या सुरू करण्यात आल्या. रविवारी रात्री स्वाब तपासणीचा अहवाल आल्यानंतर कोरोनाची लक्षणे असल्याचे स्पष्ट झाल्याने आपण जनसंपर्क टाळला आहे. असेही त्यांनी सांगितले.
काल सोमवारी जन्मदिनीही ते कार्यकर्त्यांपासून दूर राहिले अन्यथा कम्युनिटी स्प्रेड चा धोका झाला असता. दरम्यान आपणआपण सुरक्षित आहोत अशी माहिती त्यांनी तरुण भारतशी बोलताना दिली आहे.