ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुडगाव मधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावर पात्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते रुग्णालयाच्या आयसीयू -7 मध्ये आहेत. सद्य स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे. त्यांची कोरोनाची टेस्ट केली जाणार आहे.
पात्रा हे अनेक टीव्ही चर्चांमध्ये भाजपची बाजू मांडत असतात. पात्रा यांनी तासाभरापूर्वी भाजप नेते भूपेंद्र यादव यांच्या पत्रकार परिषदेचे ट्विट रिट्विट केले आहे. सकाळपासून असते ट्विटरवर ऍक्टिव दिसत होते. सकाळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी अभिवादन ही आपल्या ट्विटर अकाउंट वरून केले होते.