मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : उपजिल्हाधिकाऱयांकडून मान्यता मिळविणे बंधनकारक, मंत्रिमंडळ बैठकीत नव्या एसओपीवर शिक्कामोर्तब
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांना आता घरी क्वारंटाईन होण्याचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र त्यासाठी उपजिल्हाधिकाऱयांकडून मान्यता मिळविणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला.
काल मंत्रिमंडळ बैठकीत या नवीन एसओपीवर शिक्कामोर्तब केले. पूर्ण देशभरात एमएचए मार्गदर्शकतत्त्वे व आयसीएमआरच्या मार्गदर्शकतत्वानुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरी क्वारंटाईन होण्याचा पर्याय आहे. पूर्ण देशभरात ही एसओपी पाळली जाते. गोव्यात अद्याप हा निर्णय झाला नव्हता. पण मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा झाली. ज्याला घरी क्वारंटाईन होण्याची इच्छा आहे व स्वतः तयार आहे त्याला रहायला हरकत नाही.
त्याचबरोबर त्याच्या घरात जर तशा सुविधा उपलब्ध आहेत तर शक्य आहे. वेगळा बेडरूम त्याला जोडून शौचालय आहे व जो स्वतः आपली काळजी घेऊ शकतो तसेच ऑक्सीमीटर ठेवू शकतो किंवा अन्य सर्व पॅरामीटर बाळगू शकतो. तर सरकार त्यासाठी तयार आहे. मात्र त्या रुग्णाने उपजिल्हाधिकाऱयांकडून ऑनलाईन अर्ज पाठवावा लागेल व स्वेच्छेने घरी क्वारंटाईन होत असल्याचे स्पष्ट करावे लागणार आहे.
एकाच घरातील पाच लोक कोरोनाबाधित झाले व लक्षणे नाहीत तर ते पाचही लोक घरीच राहून आपली काळजी घेऊ शकतात. त्याचबरोबर परिसरात रहाणाऱया लोकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीला वेगळय़ा नजरेने पहायची गरज नाही.
ज्या टय़ुलिप फॅक्टरीमध्ये पहिल्यांदा रुग्ण सापडले होते ती फॅक्टरी बंद केली आहे. तिथे 130 रुग्ण सापडले होते. अन्य फार्मासिटीकल कंपन्या व इतर कंपन्या सर्व प्रकारची काळजी घेतात. त्यानंतर अन्य कोणत्याही कंपनीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले नाहीत. अन्न व औषध प्रशासन संचालक तसेच मजूर आयुक्त हे लक्ष ठेवून आहेत. हल्लीच एक बैठक झाली त्यामध्ये नियम पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. झुवारीमध्ये मजुरांना बोलावले होते. त्यांची चाचणी केली गेली. कोरोना पॉझिटिव्ह सापडताच त्यांना क्वारंटाईन केले. पण ते फॅक्टरीत गेले नव्हते.
बाहेरून येणाऱयांची आजपासून ऍन्टीजन चाचणी
राज्यात ऍन्टीजन चाचणी आज गुरुवारपासून सुरु होणार आहे. जे गोव्याबाहेरून येतात त्यांची ऍन्टीजन चाचणी होणार आहे. जे गोव्याबाहेरून येतात त्याची त्वरित चाचणी व्हायला हवी. जे बाहेरून येतात त्यांची संख्या बरीच आहे. 400 ते 500 लोक येतात. त्यांच्यापैकी काही पॉझिटिव्ह सापडतात. पण ते त्वरित क्वारंटाईन होतात.
मांगोरहील येथे ऍन्टीबोडी चाचणी सुरु केली आहे. त्यासाठी 500 पेक्षा जास्त कीट आणले आहेत. अगोदर छोटा मांगूर येथून सुरुवात केली जाईल. आमदार कार्लुस आल्मेदा यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच ऍन्टीबॉडी चाचणी होताच तेथील लोक प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार असल्याचेही कार्लुस यांनी सांगितले.
आरोग्य सेतू ऍप बंधनकारक नाही
जिल्हाधिकारी इमारतीत प्रवेश करण्यासाठी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱयांशी बोलणी केली आहे. ज्यांच्यापाशी स्मार्टफोन आहे त्यांनी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करावे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपाशी ऍप असेल. पण ज्याच्यापाशी स्मार्टफोन नाही त्याला प्रवेश दिला जाणार नाही, असे नाही. ही चुकीची माहिती आहे.
एन 95 मास्कवर गोव्यात बंदी
एन 95 मास्कचा वापर गोव्यात करू दिला जाणार नाही. याबाबतचा अद्यादेश सरकारने जारी केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतचे आदेश दिले असून एन 95 मास्क वापरू नये असे राज्याना सूचित केले आहे.
कोविड इस्पितळ मडगाव येथे आयसीयु विभागात काम करण्यासाठी 30 नर्सची भरती केली जाणार आहे. तसेच काही लॅब तंत्रज्ञानांचीही भरती केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय नाही
राज्यातील विद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. विद्यालयांनी ऑनलाईन क्लास सुरु केले आहेत. पण प्रत्यक्षात विद्यालये व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही.
क्लाफासियो डायस आयसीयुतून बाहेर
कोरोनाची बाधा झालेले आमदार क्लाफासियो डायस यांची प्रकृती चांगली असून त्यांना आयसीयुतून बाहेर आणले आहे. डायस हे मडगाव कोरोना इस्पितळात उपचार घेत आहेत. मात्र अजुनही ते ऑक्सीजनचा आधार घेत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मायनिंग, मिनरल्ससाठी टीसीपीकडे जावे लागणार नाही
मायनिंगशी संबंधित मायनर मिनरल्सच्या व्यावसायिक मान्यतेसाठी नगरनियोजन खात्याकडे जावे लागत होते. त्यामुळे सरकारने नगरनियोजन कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. खाण लीजांच्या व्यावसायिक नियमानुसार टीसीपीतून बाहेर काढले आहे, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळ बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर यांना एक वर्षाची सेवा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.