शुक्रवारी11 नवे रुग्ण :14 जण कोरोनामुक्त
बेळगाव : कोरोना सक्रिय रुग्णसंख्या वाढतीच आहे. शुक्रवारी सायंकाळी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिह्यात 163 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत असून आरोग्य विभागाने स्वॅब तपासणीही वाढविली आहे.
11 पैकी 9 जण बेळगाव शहर व उपनगरांतील आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुक्त झालेल्या 14 जणांना घरी जाऊ देण्यात आले आहे. जाधवनगर, वैभवनगर, सदाशिवनगर, हनुमाननगर, शास्त्राrनगर, उज्वलनगर, संभाजीनगर, कुमारस्वामी लेआऊट, न्यू गांधीनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
चिकोडी तालुक्मयातील कोथळी व रायबाग तालुक्मयातील मोरब येथेही प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 164 इतकी झाली असून त्यापैकी 26 हजार 659 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. अद्याप 2 हजार 192 जणांचा अहवाल यायचा आहे.