उपचार घेणाऱयांची संख्या 29
प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री उशिरा दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण दाखल झाले. त्यामुळे सद्या या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱयांची संख्या 29 झाली आहे. रविवारी दिवसभरात एकही रूग्ण दाखल झाला नव्हता. एका रूग्णाला हॉस्पिटलातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
शनिवारी रात्री दाखल झालेल्या दोन रूग्णांमध्ये एक 13 वर्षांच्या मुलाचा समावेश असून दुसरी महिला 59 वर्षाची आहे. ही महिला महाराष्ट्रातून गोव्यात आली होती. तिला पूर्वीच हृदयविकाराचा आजार असल्याने तिच्यावर कोविड हॉस्पिटलमध्ये ‘क्रिटिकल केस’ म्हणून उपचार केले जाणार आहेत. तीन वयस्क व्यक्तींवर उपचार सुरू असून सर्वांकडून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एका चार महिन्यांच्या मुलाबरोबरच अन्य दोन मुलांवर या ठिकाणी उपचार सुरू आहे. त्यात चार महिन्यांच्या मुलाची एकदा चाचणी घेतली असता, ते निगेटिव्ह झाले नसल्याने, त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. त्याची आई निगेटिव्ह असून तीही मुलासोबत कोविड हॉस्पिटलमध्ये आहे. अन्य एका रूग्णाचे नमूने चाचणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्याला आज सोमवारी घरी पाठविण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
गोव्यात 31 मे 2020 पर्यंत कोरोनाबाधित 71
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 42
उपचार घेणारे रुग्ण 29