कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून उपाय योजना, मनपा हद्दीत विशेष अधिकाऱयांची नियुक्ती
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजना राबविण्यास पुन्हा एकदा पावले उचलली आहेत. शहर व्याप्तीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्याबरोबरच मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने शहरात 7 विशेष अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे.
कोरोनारुग्ण संख्येचा आलेख वाढतच चालला आहे. विविध राज्यांसह कर्नाटकाच्या शेजारी असलेल्या महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटकचा चौथा क्रमांक आहे. विशेषतः बेंगळूर शहरात रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. सध्या बेळगाव शहरात लोकसभा पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नियमावलींचे पालन करून निवडणुका पार पाडण्याची सूचना आरोग्य खात्याने केली आहे. विविध सण, समारंभ आणि सभा आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. होळी आणि रंगोत्सव साधेपणाने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोना नियमावलींची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई
शहरात सभा, समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालून सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे, तसेच मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. महापालिका व्याप्तीमध्ये विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. विनामास्क फिरणाऱयांकडून 250 रुपये दंड आकारण्याचा आदेश देण्यात आला आहे. या नियमावलींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महापालिकेच्या विशेष अधिकाऱयांची नियुक्ती करण्याचा आदेश शासनाने बजावला आहे. त्यामुळे नियमावलींची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने 7 पोलीसस्टेशन व्याप्तीमध्ये विशेष अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच सभा, कार्यक्रमांवर नजर ठेवण्याची जबाबदारी विशेष अधिकाऱयांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक कारवाईचे धोरण अवलंबण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिका प्रशासनाने एपीएमसी पोलीस स्थानक हद्दीत वरि÷ स्वच्छता निरीक्षक एस. व्ही. हुबळी, माळमारूती पोलीस स्थानक हद्दीसाठी पर्यावरण साहाय्यक अभियंत्या महादेवी, मार्केट पोलीस स्थानक हद्दीत पर्यावरण साहाय्यक अभियंते आदिलखान पठाण, खडेबाजार पोलीस स्थानक हद्दीत वरि÷ स्वच्छता निरीक्षक संतोष कुरबेट, शहापूर पोलीस स्थानक हद्दीत कनि÷ स्वच्छता निरीक्षक शिवानंद भोसले, उद्यमबाग पोलीस स्थानक हद्दीत वरि÷ आरोग्य निरीक्षक अनिल बोरगावी, टिळकवाडी पोलीसस्थानक हद्दीसाठी कनि÷ आरोग्य निरीक्षक उत्तम गणाचारी आदींची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.