कणकवलीतील 7, पिंगुळी 4, तिथवलीतील 3 रुग्णांचा समावेश : एकूण रुग्णसंख्या 213 वर : सद्यस्थितीत 57 रुग्ण सक्रिय
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्गात ‘कोरोना’बाधित रुग्णांचा वेग पुन्हा वाढू लागला असून जिल्हय़ात आणखी चौदाजणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिह्यात ‘कोरोना’बाधित रुग्णांची एकूण संख्या द्विशतक पार करत 213 वर पोहोचली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यातील सात, कुडाळ तालुक्यातील चौघे व वैभववाडीतील तीन रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ात 57 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आणखी एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
‘कोरोना’चा वेग मंदावलेला असतानाच जिह्यात पुन्हा ‘कोरोना’बाधित रुग्णांचा वेग झपाटय़ाने वाढू लागला आहे. विशेषतः कणकवली शहर व परिसरातील गावांमध्ये हे रुग्ण सापडत असून मुंबई प्रवास करून आलेली एक व्यक्ती सर्वत्र फिरल्यामुळे त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती ‘कोरोना’बाधित झाल्या आहेत. रविवारी आणखी चौदा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यात कणकवली तालुक्यातील आशिये गावातील 2, जानवली 2, ओझरम एक, तळेरे 1, हरकुळ खुर्द 1, वैभववाडी तालुक्यात तिथवली 3, तर कुडाळ तालुक्यात चार रुग्ण आढळले आहेत. ते सर्व पिंगुळी येथील आहेत. नवीन चौदा रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 213 झाली आहे. आतापर्यंत एकूण 151 रुग्णांनी ‘कोरोना’वर मात केली आहे. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला असून एक रुग्ण उपचारासाठी मुंबईला गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 57 रुग्ण सक्रिय असून उपचाराखाली आहेत. जिल्हय़ात नव्याने जे रुग्ण सापडत आहेत, त्या-त्या गावातील वाडीमध्ये कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
कणकवली शहरात कंटेनमेंट झोन
कणकवली शहरात साईनगर साईपूजा अपार्टमेंट ते साईशब्द अपार्टमेंट येथील 300 मीटर परिसर 65 घरे, 65 कुटुंब, 54 लोकसंख्या, राजेंद्र म्हापसेकर घर गुरुकृपा अपार्टमेंट संजय वाळके स्टॉल, विद्यामंदिर हायस्कूलकडे जाणारा रस्ता, रेशन दुकान, स्वामी डिजिटल फोटो स्टुडिओ- खरेदी विक्री संघाकडे जाणारा रस्ता, राजन वरवडेकर, कॉमन सेन्स प्रिंटिंग प्रेस येथून हर्णेआळीत जाणारा रस्ता, झेंडा चौक खानोलकर पतंजली दुकान, पवन नॉव्हेल्टी दुकान ढालकाठीकडे जाणारा बाजारपेठ रस्ता, हरी महादेव सुतार घर-शेखर दिगंबर उचले घर-मारुती मंदिरकडे जाणारा रस्ता, हरी निखार्गे घर-रवी खोचरे घर-पटकीदेवी मंदिराकडे जाणारा बाजारपेठ रस्ता या ठिकाणी 1303 घरे, 1393 कुटुंब व 5,262 लोकसंख्या, गंगासिंधु अपार्टमेंट व सदर इमारतीमधील सर्व व्यापारी गाळे या ठिकाणी एक अपार्टमेंट, 7 कुटुंब व 20 लोकसंख्या आणि स्नेहगंध निवास-अशोक चंद्रकांत सावंत यांचे घर परिसर एक घर, दोन कुटुंब व सहा लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेनमेंट झोनमध्ये 10 जुलैपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रात नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. सदर आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
अ.क्र. विषय संख्या
1 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 3,636
2 अहवाल प्राप्त झालेले नमुने 3599
3 आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने 213
4 निगेटिव्ह आलेले नमुने 3,386
5 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 37
6 सद्यस्थितीत जिह्यातील सक्रिय रुग्ण 57
7 इतर जिल्हे व इतर राज्यातील रुग्ण 1 (मुंबई)
8 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4
9 डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 151
10 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 59
11 रविवारी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 4829
12 संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 17938
13 शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 59
14 गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 15,661
15 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 2,218
16 2 मेपासून आतापर्यंत जिह्यात आलेल्या व्यक्ती 1,13,212