प्रतिनिधी / पणजी
गेल्या 24 तासात म्हणजे बुधवारी कोरोनाचे 3 बळी गेले असून एकूण मृतांचा आकडा 693 झाला आहे. काल 117 नवे बाधित सापडले तर 64 जण बरे होऊन घरी परतले. सध्या 1419 जण सक्रिय कोरोना रुग्ण असून संशयित म्हणून 40 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले आहे. तर 96 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. आतापर्यंत मिळून एकूण 48241 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 46132 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. डिचोली – 33, सांखळी – 27, पेडणे – 31, वाळपई – 23, म्हापसा – 43, पणजी – 92, हळदोणा – 25, बेतकी – 45, कांदोळी – 64, कासारवर्णे – 4, कोलवाळ – 16, खोर्ली – 36, चिंबल – 68, शिवोली – 60, पर्वरी – 102, मये – 13, कुडचडे – 15, काणकोण – 38, मडगांव – 120, वास्को – 78, बाळ्ळी – 16, कासावल – 55, चिंचिणी – 43, कुठ्ठाळी – 52, कुडतरी – 35, लोटली – 39, मडकई – 36, केपे – 26, सांगे – 7, शिरोडा – 16, धारबांदोडा – 17, फोंडा – 100, नावेली – 33.
2 डिसेंबरपर्यंतचे एकूण रुग्ण 48241
2 डिसेंबरपर्यंतचे बरे झालेले रुग्ण 46132
2 डिसेंबरपर्यंतचे बरे झालेले रुग्ण 1416
2 डिसेंबरचे नवीन रुग्ण 117
2 डिसेंबरचे बरे झालेले रुग्ण 64
2 डिसेंबरचे कोरोना बळी 3
आतापर्यंतचे एकूण बळी 693