प्रतिनिधी / पणजी
गेल्या 24 तासात कोरोनामुळे 3 जणांचे बळी गेले असून आतापर्यंतच्या एकुण मृतांचा आकडा 670 झाला आहे. बुधवरी 162 नवे रुग्ण सापडले तर 178 जण बरे होऊन घरी परतले.
बुधवारी कोरोनाचे संशियत रुग्ण म्हणून 36 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 172 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. आतापर्यंत मिळून एकूण 46344 जणांना कोरोनाची लागण झाली होती, त्यातील 44310 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे. सध्या 1364 जण सक्रिय रुग्ण असून विविध हॉस्पिटल्स- कोविड सेंटरात त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे : डिचोली 36, सांखळी-38, पेडणे-33, वाळपई-19, म्हापसा-52, पणजी-93, हळदोणा-11, बेतकी-29, कांदोळी-70, कासारवर्णे-9, कोलवाळ-34, खोर्ली-40, चिंबल- 66, शिवोली-41, पर्वरी- 77, मये- 13, कुडचडे- 20, काणकोण-16, मडगांव- 103, वास्को-86, बाळ्ळी-19, कासावली- 54, चिंचिणी-31, कुठ्ठाळी-78, कुडतरी- 25, लोटली-23, मडकई-14, केपे- 26, सांगे- 19, शिरोडा-26, धारबांदोडा-20, फोंडा- 107, नावेली-36, उत्तर गोव्यात कोरोना रुग्णांसाठी 275 बेड असून 210 रिकामी आहेत तर दक्षिण गोव्यातील 232 बेड पैकी 212 रिकामी असल्याची माहिती देण्यात आली.
18 नोव्हेंबरपर्यंतचे एकुण रुग्ण- 46344
बरे झालेले रुग्ण- 44310
सक्रिय कोरोना रुग्ण- 1364
18 नोव्हेंबरचे नवीन रुग्ण- 162
बरे झालेले रुग्ण- 178
कोरोना बळी- 3
आतापर्यंतचे एकुण बळी- 670