कोरोना मृत्यू, नवे रूग्ण, सक्रीय रूग्णसंख्येत घट,
कोरोना रूग्ण 1066 ः एकूण ः 1,41,460
कोरोनामुक्त 1463 ः एकूण ः 1,26,861
कोरोना मृत्यू 36 ः एकूण मृत्यू ः 4413
सक्रीय रूग्ण ः 10186
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात रविवारी कोरोनाने 36 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 66 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 463 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 10 हजार 186 झाली आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत नव्या रूग्णांत घट झाली आहे. परिणामी सक्रीय रूग्णसंख्या घटली आहे.
जिल्ह्यात रविवारी कोरोनाने 36 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 413 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 345, नगरपालिका क्षेत्रात 669, शहरात 892 तर अन्य 508 आहेत. दिवसभरात 1 हजार 463 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 26 हजार 861 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 66 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 16, भुदरगड 30, चंदगड 10, गडहिंग्लज 26, गगनबावडा 2, हातकणंगले 154, कागल 38, करवीर 175, पन्हाळा 65, राधानगरी 38, शाहूवाडी 9, शिरोळ 65, नगरपालिका क्षेत्रात 94, कोल्हापुरात 322, अन्य 22 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 41 हजार 460 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी 2 हजार 527 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 285 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 6 हजार 127 अहवाल आले. त्यातील 5 हजार 654 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 19 रिपोर्ट आले. त्यातील 657 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 9 हजार 673 स्वॅब रिपोर्ट आले.
कोरोनाने शहरातील 10 जणांचा मृत्यू
कोरोनाने बेळगाव जिल्ह्यातील एकाचा तर कोल्हापूर शहरातील 10 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील मृतांमध्ये राजारामपुरी, दौलतनगर, आर. के. नगर, गंगावेश , शुक्रवार पेठ, टेंबलाईवाडी, राजारामपुरी, बोंद्रेनगर फुलेवाडी,कनानगर, शाहू मिल कॉलनी, राजारामपुरी येथील व्यक्तींचा समावेश आहे.