प्रतिनिधी / पणजी
गेल्या 24 तासात म्हणजे बुधवारी कोरोनामुळे 4 जणांचा अंत झाला असून एकूण मृतांचा आकडा 683 वर पोहोचला आहे. काल 125 नवे कोरोनाबाधित सापडले तर 61 जण बरे होऊन घरी परतले. संशयित रुग्ण म्हणून 40 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 102 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. सध्या 1281 जण सक्रिय कोरोना रुग्ण असून ते विविध इस्पितळात, कोरोना सेंटरात उपचार घेत आहेत. आतापर्यंत मिळून एकून 47193 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 45229 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे : डिचोली – 22, सांखळी – 42, पेडणे – 32, वाळपई – 17, म्हापसा – 39, पणजी – 96, हळदोणा – 24, बेतकी – 30, कांदोळी – 76, कासारवर्णे – 6, कोलवाळ – 17, खोर्ली – 37, चिंबल – 70, शिवोली – 55, पर्वरी – 89, मये – 18, कुडचडे – 18, काणकोण – 28, मडगांवö 107, वास्को – 66, बाळ्ळी – 14, कांसावली – 50, चिंचिणी – 33, कुठ्ठाळी – 43, कुडतरी – 29, लोटली – 23, मडकई – 21, केपे – 20, सांगे – 7, शिरोडा – 28, धारबांदोडा – 14, फोंडा – 82, नावेली – 28. दरम्यान, दक्षिण गोव्यातील कोरोना आरक्षित बेड 60 पर्यंत खाली आणले असून त्यातील 47 बेड रिकामी आहेत.
- 25 नोव्हेंबरपर्यंतचे एकूण रुग्ण 47193
- 25 नोव्हेंबरपर्यंतचे बरे झालेले रुग्ण 45229
- 25 नोव्हेंबरपर्यंतचे सक्रिय कोरोना रुग्ण 1289
- 25 नोव्हेंबरचे नवीन रुग्ण 125
- 25 नोव्हेंबरचे बरे झालेले रुग्ण 61
- 25 नोव्हेंबरचे कोरोना बळी 4
- आतापर्यंतचे एकूण बळी 683