कोरोना नमुना तपासणी पाच दिवसांपासून रखडली : तब्बल 855 अहवालांची प्रतीक्षा
- आणखी 37 पॉझिटिव्ह, तीन रुग्णांचा मृत्यू
- एकूण 1 हजार 554 जण आतापर्यंत कोरोमुक्त
- कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 312
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोविड सेंटरमध्ये बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे किरकोळ स्वरुपाची लक्षणे असणाऱया कोरोना बाधित 514 रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय निवडला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. तर कोविड लॅबमधील तांत्रिक अडचणीमुळे गेल्या पाच दिवसांपासून कोरोना नमुना तपासणी रखडली असून तब्बल 855 अहवाल प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे हे सर्वजण तणावाखाली आहेत.
दरम्यान कोविड लॅबशिवाय रॅपिड टेस्ट आणि पडवे येथील खासगी लॅबमधील तपासणी करण्यात आलेल्या कोरोना नमुना तपासणी अहवालांमधून शुक्रवारी नव्याने 37 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱया तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चौकुळ येथील 57 वषीय पुरुष, कणकवली येथील 70 वषीय वृद्ध आणि नेरुर येथील 72 वषीय वृद्धाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
514 रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून एकूण रुग्ण संख्या 2 हजार 923 वर पोहोचली आहे. त्यातील 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 554 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर कोरोना सक्रिय 1 हजार 312 रुग्ण आहेत. जिल्हय़ात वाढत जाणाऱया रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये चांगली सेवा मिळणेही अवघड झाले आहे. त्यामुळे ज्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये किरकोळ लक्षणे आहेत किंवा लक्षणेच नाहीत आणि ज्यांच्याकडे स्वतंत्र खोलीची व्यवस्था आहे, अशा 514 रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय निवडून घरीच उपचार घेणे पसंत केले आहे.
855 अहवालाची प्रतीक्षा
जिल्हा रुग्णालयाच्या कोविड लॅबमधील तांत्रिक अडचणीमुळे गेल्या पाच दिवसांपासून कोरोना नमुने तपासणीच झालेली नाही. पाच दिवसांचे तब्बल 855 कोरोना तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे तपासणीसाठी नमुने दिलेल्या व्यक्तींचा जीव टांगणीला लागला आहे.
वैभववाडी तालुका ‘कंटेनमेंट झोन’ मुक्त
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हय़ामध्ये 18 सप्टेंबर रोजी एकूण 361 ठिकाणी सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. सर्वाधिक 135 कंटेनमेंट झोन कणकवली तालुक्मयात आहेत. वैभववाडी तालुक्मयात एकही कंटेनमेंट झोन नाही. महसूल उप विभाग व तालुकानिहाय कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे आहेत. देवगड तालुका – 23 कंटेनमेंट झोन, कणकवली तालुका – 135 कंटेनमेंट झोन, वैभववाडी तालुका – कंटेनमेंट झोन नाही, कणकवली महसूल उपविभाग – 158 कंटेनमेंट झोन : मालवण तालुका – 45 कंटेनमेंट झोन, कुडाळ तालुका – 86 कंटेनमेंट झोन, कुडाळ महसूल उपविभाग : 131 कंटेनमेंट झोन : वेंगुर्ले तालुका – 12 कंटेनमेंट झोन, सावंतवाडी तालुका – 43 कंटेनमेंट झोन, दोडामार्ग तालुका – 17 कंटेनमेंट झोन, सावंतवाडी महसूल उपविभागात एकूण 72 कंटेनमेंट झोन आहेत.
जिल्हय़ात आतापर्यंत एकूण 1 हजार 21 कंटेनमेंट झोन लागू करण्यात आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्मयात सर्वाधिक 304 झोन असून त्यानंतर कुडाळ – 219, सावंतवाडी – 197, मालवण – 115, देवगड – 72, दोडामार्ग – 57, वेंगुर्ले – 45 आणि वैभववाडी – 12 याप्रमाणे कंटेनमेंट झोन लागू केले आहेत. यापैकी 660 कंटेनमेंट झोन उठविण्यात आले असून त्यामध्ये कणकवली तालुक्मयातील 169, देवगड – 49, वैभववाडी – 12, मालवण – 70, कुडाळ – 133, वेंगुर्ले – 33, सावंतवाडी – 154 व दोडामार्ग तालुक्मयातील 40 कंटेनमेंट झोनचा समावेश आहे.
शुक्रवारी 33 कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले. त्यामध्ये कणकवली – 17, मालवण – पाच, कुडाळ – नऊ व वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्मयात प्रत्येकी एक कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 21999
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 2923
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 18221
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 855
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 1312
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 57
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 1554
गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 8396
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12724