विरोधकांनी केला आरोप : सत्ताधारी चहापानात व्यस्त : जिल्हाधिकाऱयांनीच आदेश काढल्याचे दिले कारण
प्रतिनिधी / सातारा
नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेली होती. या सभेला सुरुवात राष्ट्रगीत झाल्यानंतर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सभा तहकुब केल्याचे जाहीर केले. त्यामुळे सभेत नुकत्याच सहभागी झालेल्या नगरसेवकांचा चांगलाच हिरमोड झाला. विरोधी नगरसेवकांनी चांगलाच त्यावरुन आरोप केला. सभा कोरोनाच्या कारणास्तव तहकुब ठेवून पुढील सभा दि. 5 रोजी होणार असल्याचे नगराध्यक्षांनीच जाहीर केले. त्यानंतर त्यांच्या केबीनमध्ये उपस्थित नगरसेवकांचा चहापानाचा कार्यक्रम सर्व नियम पाळून पार पडला.
सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन असूनही गाजणार होती. त्याकरिता नगरविकास आघाडीचे विरोधी पक्ष नेते अशोक मोने, अमोल मोहिते, अविनाश कदम, भाजपाचे नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, आशा पंडित यांनी जोरदार तयारी करुन ठेवली होती. पाण्याच्या समस्येवर बोलण्यासाठी विजय काटवटे यांनी तर पालिकेत हजेरी लावली. नगरसेविका आशा पंडित यांनीही पालिकेतच नगराध्यक्षांच्या केबीनबाहेर त्यांच्या स्वीय्य सहाय्यकांच्या केबीनमध्ये थांबून सभेत सहभाग नोंदवला होता. तर उपाध्यक्ष मनोज शेंडे, सुजाता राजेमहाडिक, बाळासाहेब ढेकणे यांनी उपाध्यक्षांच्या केबीनमधून सहभाग नोंदवला हाता. पाणी पुरवठा सभापती सीता हादगे या त्यांच्या केबीनमधून तर अण्णा लेवे त्यांच्या कार्यालयातून सहभागी झाले होंते. सभेला राष्ट्रगीताने सभेला सुरुवात झाली अन् काही कळायच्या आत लगेच सभा संपल्याचे नगराध्यक्षा माधवी कदम यांनी कोरोनामुळे सभा घेता येणार नाही. आपण सभा तहकुब करत आहोत, असे जाहीर केले. पुढील सभा दि. 5 रोजी होणार आहे, असे सांगून सभा संपवली. त्यामुळे जे सभेत सहभागी होत होते. त्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. दरम्यान, सातारा पालिकेची सभा तहकूब केल्याबाबत विरोधकांच्यावतीने अशोक मोने, धनंजय जांभळे आणि भाजपाचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी आपले परखडपणे मत व्यक्त केले.
हे राजकारण नाही तर काय?
सत्ताधाऱयांनी सभा तहकुब केली. त्याला कारण म्हणजे सत्ताधारी आघाडीत एकी नाही. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर कोणी द्यायचे. याचा मेळ नसल्याने आजची सभा ही तहकुब करावी लागली. तहकुब करत असताना शासनाचा कुठलाही जीआर वाचून दाखवला नाही. कोणतेही कारण सांगिलते नाही. सत्तारुढ आढाडीला ज्यावेळी सभा काढली त्यावेळीच समजायला पाहिजे होते. कोव्हिड जास्त प्रमाणात वाढायला लागले आहे. सभा काढायला पहिजे होती. काढून सुद्दा ही सभा होत नसेल तर ते सत्तारुढ आघाडीचे दुदैव आहे. आज त्यांनी कारण सांगितले की नगरपालिकेतलील कर्मचाऱयांना लसीकरण झालेल नाही. ही सभा घेण्यास हरकत नव्हती. त्यांच्यात एकमेकांच्यात भांडणे असल्याने सभ घेवू शकले नाहीत. दुर्दैवी बाब आहे. सत्तारुढ आघाडीची सत्ता असताना बहुमत असताना जर अशा सभा तहकुब करत असतील तर सातारकरांचे हित काय बघणार आहेत. या संदर्भात सातारकरांनी विचार करावा आणि आज सभा तहकुब करुन शहरातील विकासाची कामे आडवण्यासाठी व एकमेकांची हितंबसंध आल्याने सभा तहकुब करावी लागली ही दुर्दैवी बाब आहे तरी सातारकरांनी साताऱयाचा विकास असलेला अजेंडा जर ही सभा झाली असती तर येणाऱया पावसाळय़ात ही कामे झाली असती म्हणून सातारकरांनी विचार केला पाहिजे. सत्तारुढ आघाडीने हा का खेळ लावला आहे. त्यांचे नेते मात्र म्हणतात राजकारण करत नाही समाजकारण करतो तर त्यांनी अस मोठं कुठलं समाजकारण केल हे दाखवून द्यावे. सभा तहकुब करावी लागते हे राजकारण आहे की समाजकारण आहे याचा खुलासा सातारा विकास आघाडीने करावा
अशोक मोने नगरसेवक
सभा तहकुब करण्याला कुठलाही बेस नाही
नगराध्यक्षांनी जो सभागृहापुढे खुलासा केला आहे. त्यात कुठलाही बोध होत नाही.त्यांनी सांगितले की शासनाच्या गाईडलाईन्स आलेले आहेत. गाईड लाईन्स काय आल्या आहेत. 50 टक्के उपस्थिती असावी असे परंतु नगराध्यक्षांच्या येथे तीन जण असणार, प्रत्येक एचओडी त्यांच्या त्यांच्या विभागातून जॉईंड झाले असते तर आजची मिटींग झाली असती. सातारच्या नगराध्यक्षांनी आज मिटींग तहकुब केली कुठलाही त्याला बेस नाही. कुठलेही कारण स्पष्ट कळाले नाही. पाच तारखेला सभा घेण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मिनी लॉकडाऊन आहे. गेल्या वर्षभरात नगरसेवकांची विषय पेंडींग आहेत. सातारच्या नगराध्यक्षांनी काय सांगितले नाही. आठ महिन्यात नगरसेवकांचे विषय नगराध्यक्षांनी मार्गी लावले पाहिजेत.
वसंत लेवे नगसेवक
स्वतःच्या स्वार्थासाठी सभा स्थगित केली
सातारा विकास आघाडीमध्येच दोन मतप्रवाह आहेत. त्यातील एका मतप्रवाहनाने आपले विषय दिले नव्हते. त्यांनी अध्यक्षांवर दबाव आणून सगळय़ांना अस दाखवायचे की आम्ही त्यामध्ये नाहीच. पण मराटीत एक म्हण आहे की मी नाही त्यातली अन् कडी लाव आतील प्रमाणे सभा सुरु करायची सातारा शहराला वेठीस धरुन स्वतःच्या स्वार्थासाठी सभा विस्कळीत करुन सभा स्थगित केली.
धनंजय जांभळे भाजपा नगरसेवक