तुये येथील नवीन सरकारी इस्पितळाच्या इमारतीत 50 खाटय़ाची सोय करणारः मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे
प्रतिनिधी / पेडणे
कोरोनाच्या तिसऱया लाटेसाठी पेडणे तालुक्मयात सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. तुये येथील नवीन सरकारी इस्पितळाच्या इमारतीत 50 खाटय़ाची सोय करण्याचे मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांचे सरकारी अधिकारी आदेश दिले.
कोरोनाच्या तिसऱया लाटेची पूर्व तयारी व त्याचा सामना करण्यासाठी सोमवारी मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी सरकारने खास नियुक्त केलेले नोडल अधिकारी गुरुदास पिळर्णकर ,पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर,पेडणे मामलेदार अनंत मळीक, तुये केंद्राच्या आरोग्य डा?.विद्या परब, स्टीवर्ड अधिकारी नमिता आजगावकर,अभियंते रोहन साळगावकर, श्रीकांत पाटील यांची बैठक घेऊन आमदार सोपटे यांनी पुढील दोन महिन्याच्या आत हे 50 खाटांचे इस्पितळ तयार करण्याचे आदेश दिले.
कोरोनाची तिसरी लाट येण्यापुर्वी सरकार या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी करत असून त्या दृष्टीने हा प्रयत्न आम्ही करत असल्याचे सोपटे यांनी सांगितले. या इस्पितळात पन्नास खाटांसह नवीन यंत्रणा उभारण्यात येणार असून त्यासाठी लागणाऱया साधन सुविधा या सर्व लवकरात लवकर करावे असे आदेश यावेळी आमदार दयानंद सोपटे यांनी संबंधितअधिका-यांना दिले.
ते म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मागील आठवडय़ात सावळवाडा येथील केअर सेंटर तसेच तुये इस्पितळात भेट देऊन यावेळी पन्नास खाटाचे इस्पितळ उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हे काम हाती घेण्यात आल्याचे आमदार सोपटे यांनी सांगितले.
कोरोनावर मात करण्यासाठी सर्व जनतेने तसेच सरकारी यंत्रणेने सहकार्य करण्याची गरज असून सरकारी यंत्रणा आपल्या परीने काम करत आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही काम करतो . कोरोनाचे संकट लक्षात घेऊन सावळवाडा येथील क्रीडा संकुलात उभारलेले कोरोना केअर सेंटर उभारण्यात आल्याची माहिती यावेळी आमदार सोपटे यांनी दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी या सेंटरमध्ये ऑक्सजिनचा तुडवडा होऊ नये यासाठी दहा आ?क्सजिन कॉन्सन्टेटर पुरवले त्याचप्रमाणे या सेंटरला नवीन जनरेटर तसेच ?म्ब?लन्सची सोय करण्याचे आश्वासन दिले असून ती लवकरात रुग्णवाहिका या केंद्राला मिळणार आहे. तसेच तुये येथील आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार असून या केंद्रावर अपुरे कर्मचारी , अन्य स्टाफ आहेत त्याचा पाठपुरावा करून त्याची भरती लवकरच करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिल्याबद्दल आमदार सोपटे यांनी त्यांना धन्यवाद दिले. कोरोना काळात सर्व नागरिकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी त्याचबरोबर येणारी तिसऱया लाटे साठी सरकारी यंत्रणा सज्ज असून त्या दृष्टिकोनातून आज आम्ही या नवीन इमारतीची पाहणी करून पन्नास खाटांचे इस्पितळ उभे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यादृष्टीने आज पासून हे काम पुढील दोन महिन्याच्या आत पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी आमदार दयानंद सोपटे यांनी पत्रकारांना दिली.