ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात मागील शंभर दिवसांपासून दिल्लीतील शाहीनबागेत सुरू असलेल्या आंदोलनाला पोलिसांनी कारवाई करत आज ब्रेक लावला.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाहीनबाग परिसरात सुरू असलेले महिलांचे आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली होती. महिलांनी पोलिसांचा आदेश झुगारून हे आंदोलन सुरूच ठेवले होते. अखेर पोलिसांनी आज सकाळी आंदोलन आंदोलनस्थळी धाव घेऊन कारवाई करत आंदोलन हटवले. तसेच आंदोलनस्थळी असणारे साहित्यही पोलिसांनी जप्त केले.