ऑनलाईन टीम / कोल्हापूर
राज्यभरातील शाळांबाबतही निर्णय उद्या दुपार पर्यंत होणार आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यात कोरोना फैलाव रोखण्यासाठी राज्यशासन कडक निर्बंध लागू करु शकते अशा आशयाचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात भाष्य केले होते. या पार्श्वभूमीवर आता राज्यशासनाने नवी नियमावली जाहीर केली असून राज्यातील वेगाने फैलावणाऱ्या कोरोनासह कोरोनाच्या नव्या व्हेरिंटला रोखण्यासाठी राज्याने हे पाऊल टाकले आहे.
असे असतील नवे नियम
उद्या दि. 9 जानेवारी 2022 मध्यरात्रीपासून राज्यात लागू होतील नवे नियम
सकाळी ५ ते रात्री ११ राज्यात जमावबंदी लागू
रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू
मैदाने उद्याने पर्यटन स्थळे बंद राहणार
रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू राहणार
२ डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार
राज्यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार
खासगी कंपन्यांमध्ये २ डोस घेतलेल्यांनाच परवानगी
खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील
लग्नासाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांनाच परवानगी