ऑनलाईन टीम / लंडन :
कोरोनाच्या डेल्टा या धोकादायक व्हेरिएंटनंतर आता ‘म्यू’ व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. कोलंबियात ‘म्यू’ व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळत असून, या व्हेरिएंटवर लसींची परिणामकारकता कमी असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.
बी. 1.621 असे या व्हेरिएंटचे शास्त्रीय नाव असून, त्याचा जागतिक प्रसार 0.1 टक्के आहे. कोलंबिया, इक्वेडोर, दक्षिण अमेरिका आणि युरोपात हा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. आतापर्यंत जगभरातील 39 देशांमध्ये ‘म्यू’ व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत या प्रकाराचा समावेश 30 ऑगस्टला करण्यात आला आहे. या व्हेरिएंटवर जागतिक आरोग्य संघटनेने संशोधन सुरू केले आहे.