कंपनीकडून 30 जूनपर्यंत सर्व्हिसिंगसह वॉरंटी कालावधीत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यामाहा मोटार इंडियाकडून कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या काळात आपल्या ग्राहकांना विविध प्ररकारच्या मिळणाऱया सुविधांमच्या कालावधीत वाढ करुन मोठा दिलासा दिला आहे. कंपनीकडून वाहनांचे सर्व्हिसिंग आणि वॉरंटी कार्डच्या कालावधी वाढ करुन ती येत्या 30 जूनपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती दिली आहे. सध्या संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यामुळे जास्तीत जास्त डीलरशिप आणि सर्व्हिंसिंगची केंद्र बंद झाली आहेत. यामुळे त्या सुविधा ग्राहकांना मिळण्यासाठी ही मुदत वाढ केली आहे.
या सुविधांमध्ये मुदत वाढ
मोफत सर्व्हिस, नॉर्मल वॉरंटी, ऍक्सिटेंडेड वॉरंटी आणि ऍन्युअल मेन्टनन्स कॉन्ट्रक्टर आदी सुविधांमध्ये येत्या जूनपर्यंत मुदत वाढ मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.