नवी दिल्ली : कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या प्रभावामुळे मार्च महिन्याच्या अंतिम आठवडय़ापासून वाहन क्षेत्र मोठय़ा प्रमाणात प्रभावित राहिले आहे. परंतु सध्याच्या अनलॉक प्रक्रियेमुळे गमावलेली वृद्धी पुन्हा नव्याने प्राप्त करण्यात वाहन क्षेत्राला यश मिळाले असल्याचे दिसून येतेय. जुलै महिन्यात एकूण 1,97,523 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. ही संख्या तुलनेत कमी असल्याचेही स्पष्ट आहे. परंतु जूनपेक्षाही हे आकडे समाधानकारक आहेत. प्रामुख्याने देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया यांच्या प्रवासी वाहनांची विक्री जुलै महिन्यात 1.3 टक्क्मयांनी वधारली आहे. एकूण वाहन विक्री जुलैमध्ये 97,768 झाली आहे. ब्रिटीश कार कंपनी एमजी मोटारची देशातील विक्री 40 टक्क्मयांनी वधारून 2,105 वर पोहोचली आहे. मारुतीची प्रतिस्पर्धी कंपनी हय़ुंदाई मोटार इंडियाची कारची विक्री दोन टक्क्मयांनी घटून 38,200 युनिट्सवर आली आहे. महिंद्रा ऍण्ड महिंद्राच्या प्रवासी वाहनाची विक्री जुलैमध्ये वर्षाच्या आधारे 34 टक्क्मयांनी घसरली आहे. परंतु मासिक तुलनेत पाहिल्यास मात्र 36.5 टक्क्मयांची तेजी प्राप्त केली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटारची कारची विक्री जुलै 2020 मध्ये 5386 युनिट झाली असून जूनमध्ये हाच आकडा 3866 वर राहिला होता. अवघड काळातही वाहन विक्रीत सुधारणा होत असल्याचे टोयोटा किर्लोस्करचे वरि÷ उपाध्यक्ष नवीन सोनी यांनी म्हटले आहे.
Previous Articleझसे पेरावे तसे उगवावे
Next Article अंगी कला असेल तर…
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.