बेळगाव
टाळ मृदंगाच्या तालावर पारंपरिक पद्धतीने भक्तीपूर्ण वातावरणात शनिवारी गणरायाचे थाटात आगमन झाले. कोरोनाचे सावट यावषीच्या गणेशोत्सवावर असले तरी गणेशभक्तांनी पारंपरिकता जोपासत साध्या पद्धतीने गणरायाची घरोघरी प्रति÷ापना केली. मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱया पावसाने शनिवारी मात्र उघडीप दिल्याने गणेश भक्तांमधून दिलासा व्यक्त केला जात होता.
शनिवारी सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्ती आणण्यात येत होत्या. दरवषीचा थाटमाट यावषी नसला तरी अत्यंत साध्या पद्धतीने घरातील मोजकीच मंडळी गणरायाला आणण्यासाठी दिसत होती. मास्क व सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच यावर्षीच्या गणरायाचे आगमन झाले. यामुळे घरोघरी आरतीचे सूर ऐकू येत होते.
फटाके बॅण्डबाजाला फाटा
दरवषी बेळगावमध्ये गणरायाचे आगमन हे फटाक्मयांच्या आतषबाजीत व बॅण्डबाजाच्या सुरांमध्ये होत असते. परंतु यावषी हे वातावरण दिसले नाही. फटाक्मयांची आतषबाजी अत्यंत कमी प्रमाणात दिसली. काही क्वचितच ठिकाणी बॅण्ड लावण्यात आले होते. पारंपरिक पोषाख परिधान करून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाचे आगमन झाले.
सार्वजनिक गणेशमूर्तींचेही साध्या पद्धतीने आगमन बेळगावच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाच्या परंपरेमध्ये अनेक मंडळे गणरायाचे आगमन सोहळे आयोजित करतात. परंतु यावषी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याच मंडळाने आगमन सोहळा केला नाही. अत्यंत साध्या पद्धतीने शनिवारी दुपारनंतर काही निवडक कार्यकर्त्यांच्या मदतीने गणरायाला मंदिरांमध्ये आणण्यात आले. ना ढोलताशांचा आवाज, ना फटाक्मयांची आतषबाजी अशा वातावरणात पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशमूर्ती प्रति÷ापित करण्यात आल्या.