केरळमध्ये संशयित रुग्ण वाढल्याने चिंता – गर्भवतीसह 13 जणांना बाधा झाल्याचा संशय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संसर्गाच्या काळातच आता देशात झिका व्हायरसचा धोका व्यक्त केला जात आहे. केरळमध्ये झिका व्हायरसबाधित रुग्ण वाढत असून एका गर्भवती महिलेला लागण झाल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने देशात पुन्हा एकदा झिका व्हायरसचा शिकराव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात कोरोना व्हायरसची परिस्थिती कायम असतानाच आता झिका व्हायरसमुळे नागरिकांची चिंता वाढण्याची शक्मयता आहे.
केरळमध्ये 13 जणांना झिका व्हायरसची लागण झाल्याचा संशय असल्याने त्यांचे सॅम्पल पुण्यातील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, झिका व्हायरसचा प्रसार हा एडीस प्रकारचा मच्छर चावल्याने होतो. एडीस प्रकारच्या डासांमुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप असे आजारही होतात. झिका व्हायरसचा प्रसार गर्भवती महिलेला झाल्यास तिच्या गर्भातही या व्हायरसचा प्रसार होण्याची शक्मयता असते. त्यामुळे अपत्यामध्ये काहीतरी कमतरता निर्माण होते. या रोगाचा प्रसार साधारणपणे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रात होतो. एडीस प्रकारातील डास हा शक्मयतो सकाळी आणि संध्याकाळी चावतो. सध्या जगातील 86 देशांमध्ये या प्रकाराचे डास आढळतात.
गर्भवती महिलेला झिकाच्या विळख्यात
केरळमध्ये तिरुवनंतपुरम जिह्यात एका गरोदर महिलेला झिकाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. संबंधित महिला ही ताप, सर्दी आणि शरीरावर पट्टे उठत असल्याने रुग्णालयात भरती झाली. तिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिचे ब्लड सॅम्पल पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
‘झिका’ व्हायरसची लक्षणे…
ताप येणं, त्वचेवर चट्टे पडणे, सांधेदुखी ही झिका व्हायरसची प्राथमिक लक्षणे आहेत. डोकेदुखी, अस्वस्थता असे लक्षणेही होऊ शकतात. ही लक्षण सामान्यपणे दोन ते सात दिवसांपर्यंत कायम राहतात. सध्या डास चावण्यापासून संरक्षण करणे हाच सर्वात मोठा उपाय सध्या आपल्याकडे आहे. त्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे किंवा डास होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणे या गोष्टीमुळे मोठा परिणाम होऊ शकतो.