ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत मागील 24 तासात 25 हजार 524 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1422 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 13 लाख 47 हजार 309 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 80 हजार 037 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. कोरोनाला रोखण्यात अद्यापही अमेरिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. 13.47 लाख कोरोना रूग्णांपैकी 2 लाख 38 हजार 078 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 10 लाख 29 हजार 194 ॲक्टिव केसेस आहेत. त्यामधील 16 हजार 816 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया येथे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर अमेरिकेतील 80 हजार 037 मृतांपैकी एक तृतीयांश मृत्यू हे न्यूयॉर्क शहरातील आहेत.