कारवाई कधी करणार ?
प्रतिनिधी / नांद्रे
नांद्रे.ता.मिरज.येथील ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव,नांद्रे गावकामगार तलाठी महावीर सासणे हे कोरोनाच्या महामारीत आँऊट आँफ रेजमध्ये आसून आपल्या भावाचा वाढदिवस साजरा करण्याकरिता त्यांनी चक्क नांद्रे चावडी या शासकीय कार्यालयाचा वापर करत शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत गर्दी करून विनामास्क ,सोशलडिस्टिगशनचा फज्जा उडवत वाढदिवस साजरा केला.
याबाबत नांद्रे ग्रामपंचायतीचे सदस्य अरविंद कुरणे यांनी लेखी निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांना दिला असून त्यांच्यावर कारवाई का नाही झाली असा सवाल जनता विचारत आहे. एक शासकीय अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव, तलाठी यांनी कोरोनाच्या महामारीत शासकीय नियम पायधुळी तुडवत वाढदिवस साजरा करणे ही बाब शासनाने गांर्भीयाने घेत त्यांना निलंबित करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अरविंद कुरणे यांनी केली आहे.