ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
कोरोनापेक्षा अधिक वेगाने पसरणाऱ्या आणि इबोलापेक्षा भयंकर अशा ‘डिसीज-एक्स’ विषाणूचा जगाला धोका आहे. ‘इबोला’ या विषाणूचा शोध लावणारे डॉ. जीन मॅक्स मुएंब तामफम यांनी या नव्या विषाणूबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
एका न्यूज चॅनेलच्या चर्चेत तामफम म्हणाले, आफ्रिकेतील घनदाट जंगलात डिसीज-एक्स या विषाणूचे अस्तित्व आहे. हा विषाणू कोरोनापेक्षा अधिक वेगाने पसरत आहे, त्यामुळे आपत्ती येण्याची शक्यता आहे. पशु आणि पक्षांद्वारे मानवात पसरणाऱ्या या साथीचा धोका अधिक आहे. अशा स्वरूपाचा पहिला बाधित कोंगो देशात सापडला आहे. त्याची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.
डिसीज-एक्सने बाधित या रुग्णामध्ये ताप आणि रक्तस्त्राव आढळला. त्याची इबोला चाचणी करण्यात आली ती निगेटिव्ह आली. त्यानंतर हा रुग्ण डिसीज-एक्सचा पहिला बाधित असल्याचे समोर आले.