प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीमुळे अत्यवस्थ झालेल्या जत (जि. सांगली) तालुक्मयातील एका युवकाला बेळगावला हलविताना रुग्णवाहिकेला शुक्रवारी दुपारी हुक्केरीजवळ अपघात झाला. टायर फुटून समोरुन येणाऱया दुचाकीला रुग्णवाहिकेची धडक बसून रबकवी (जि. बागलकोट) येथील एका तरुणाचा मृत्यू झाला.
शुक्रवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हुक्केरी जवळ ही घटना घडली असून हुक्केरी पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. बेळगावला हलविण्यापूर्वी कोरोनाबाधिताचाही मृत्यू झाला आहे. हुक्केरीचे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद गुडगनट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुचंडी (ता. जत) येथील एका 40 वषीय कोरोनाबाधित युवकाची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्ण वाहिकेतून उपचारासाठी बेळगावला हलविण्यात येत होते. बेल्लदबागेवाडीहून हुक्केरीला येताना रुग्णवाहिकेचा टायर फुटून दुचाकीला धडक बसली.
मोटारसायकलच्या पाठिमागे बसलेल्या सागर मल्लाप्पा दोडवाड (वय 19, रा. रबकवी) या तरुणाचा उपचाराचा उपयोग न होता मृत्यू झाला तर मोटारसायकल चालविणारा गोपाल आण्णाप्पा मुलीमनी (वय 18, रा. रबकवी) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
दुचाकीला ठोकरुन पलटी झालेल्या रुग्णवाहिकेतील सर्व जण बचावले होते. दुसऱया रुग्णवाहिकेतून कोरोनाबाधित युवकाला बेळगावला हलविताना वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. हुक्केरी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. अथणीहून कोरोनाबाधितांना बेळगावला आणताना रुग्णवाहिकेला यापूर्वीही होनग्याजवळ अपघात झाला होता.