ऑनलाईन टीम / श्रीनगर :
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना गेल्या मंगळवारी कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट झाले होते. सुरुवातीला त्यांनी आपल्या राहत्या घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, डॉक्टरांची चांगल्या पद्धतीने देखरेख राहावी यासाठी शनिवारी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
- 2 मार्च रोजी घेतली होती पहिली लस
फारुख अब्दुल्ला कोरोना संक्रमित असल्याचे समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत अनेक नेत्यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. फारुख अब्दुल्ला यांनी 2 मार्च रोजी कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी होत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. तरी देखील त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने काळजी वाढली आहे.