अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 23 जानेवारी 2022, सकाळी 11.15
● रिकव्हरी रेट 93 वर
● हॉस्पिटलायझेशन केवळ 326 जणांचे
● शनिवारी दिवसभर तपासण्या 3900
● 1124 जण नव्याने बाधित
● जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 28.82 वर
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील दररोज नव्याने होणारी बाधित वाढ ही लक्षणीय दिसून येत असली तरी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने ते रुग्ण घरच्या घरीच बरे होत आहेत. कालपर्यंत हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे 325 च्या दरम्यान होते. शनिवारी दिवसभरात 3900 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात नव्याने 1124जण बाधित आढळून आले असून पॉझिटिव्हीटी रेट 28.82 वर आहे. रिकव्हरी रेट 93 च्या दरम्यान आहे.
कोरोनामुक्तीचा वेग वाढला
जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण जास्त असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे. गेल्या आठ दिवसात कोरोनाला बाय बाय करून ठणठणीत बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या चांगली आहे. कालच्या दिवसभरात 1052 जण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 51 हजार 89 जण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यांची संख्या वाढू लागली असल्याने दिलासा आहे.
रिकव्हरी रेट 93 वर
जिल्ह्यातील आढळून येणारे रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यांचे प्रमाण पाहता रिकव्हरी रेट हा 93 वर आहे. चांगला रिकव्हरी रेट असून घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
रविवारी
नमुने-3900
बाधित-1124
रविवारपर्यंत
नमुने-2464379
बाधित-268513
मुक्त-251089
मृत्यू-6525