ऑनलाईन टीम / वेलिंग्टन :
न्यूझीलंडमध्ये मागील 100 दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांच्या नेतृत्वामुळे कोरोनावर मात करण्यात न्यूझीलंडला यश आल्याचे सांगण्यात येते.
जॅसिंडा यांनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशात कडक लाॅकडाऊनचे आदेश लागू केले होते. यावेळी देशातील कोरोना बाधितांचा आकडा केवळ 100 होता. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. न्यूझीलंडच्या कोरोनामुक्तीला 9 ऑगस्टला 100 दिवस पूर्ण झाले.
परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढत असल्याने त्यांना सीमेवरच क्वारंटाईन करण्याचा निर्णय जॅसिंडा यांनी घेतला आहे. न्यूझीलंडमधील जनजीवन सध्या सुरळीत झाले आहे. तेथे हॉटेल, रेस्टॉरंट सुरू असून तिथेही लोक बिनधास्त जातात. रग्बीचे सामने पाहण्यासाठीही लोक गर्दी करत असल्याचे सांगण्यात येते.
न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 1569 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 1526 रुग्ण बरे झाले आहेत. 21 जण अजूनही उपचार घेत आहेत. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे.