मुंबई \ ऑनलाईन टीम
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या राज्यभरातील जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही आदेश दिले आहेत.
राज्यातील नागरिकाच्या समस्या जाणून घ्या, त्यांना योग्य उपचार, कोरोना लस मिळतेय का याचा आढावा घ्या, शिवसेनेचे विचार लोकांपर्यंत पोहचवा असे आदेश शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना दिले.
शिवसेनेचे विचार गावागावत पोहचवा आणि शिवसेना राज्यभरात मजबूत करा असे आदेश पक्षप्रमुखांना दिले आहेत. आघाडी आणि युतीबाबत चिंता करु नका, प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीशी पक्ष उभा आहे. माझ गाव कोरोनामुक्त गाव मोहीम राबवा, कोरोनामुक्तीसाठी प्रत्येक गावात काम करा.महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायती प्रत्येक विभागात प्रत्येक प्रभागात बैठका घ्या, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी सर्व सेना जिल्हा प्रमुखांना दिल्या आहेत.
शिवसेनेच्या राज्यभरातील सर्व जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक आज शिवसेना भवनात पार पडली. शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या उपस्थितीत ही संघटनात्मक बैठक संपन्न झाली.