ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला असताना गुरुवारी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. गुरुवारी संक्रमित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. मागील 24 तासात 3 लाख 44 हजार 776 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 2 कोटी 79 हजार 599 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
3.43 लाख नवे रुग्ण
देशात मागील 24 तासात 3 लाख 43 हजार 144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 4000 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 2 कोटी 40 लाख 46 हजार 809 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 लाख 62 हजार 317 रुग्ण दगावले आहेत.
आतापर्यंत देशातील 17.92 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.