नव्याने 76 पॉझिटिव्ह, 51 जणांना डिस्चार्ज : सक्रिय रुग्णसंख्या 984
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनाच्या रुग्णवाढीबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. मंगळवारी वायरी (मालवण), कणकवली, पावशी (कुडाळ) या ठिकाणच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 30 वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्हय़ात आणखी 76 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले असून एकूण रुग्णसंख्या 1,985 झाली आहे. 51 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी दिली.
जिल्हय़ात जुलै अखेरपर्यंत कोरोना बाधित रुग्णसंख्या नियंत्रणात होती. त्यानंतर झपाटय़ाने रुग्ण वाढत गेले आणि एकूण रुग्णसंख्या दोन हजाराच्या घरात पोहोचली आहे. तसेच जुलै अखेरपर्यंत सात रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या सव्वा महिन्यात 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. मंगळवारी मृत्यू झालेल्या तीन रुग्णांमध्ये पावशी येथील 46 वर्षीय तरुण तसेच वायरी येथील 68 वर्षीय वृद्ध आणि कणकवली येथील 71 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.
जिल्हय़ात 971 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिह्यात 984 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
एकूण अहवाल 17,381
पॉझिटिव्ह आलेले अहवाल 1,985
निगेटिव्ह आलेले अहवाल 15,099
प्रतीक्षेतील अहवाल 297
सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण 984
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 30
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 971
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 8,842
नागरी क्षेत्रात अलगीकरण व्यक्ती 12,162