नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे येथे होणारी हिरो पुरस्कृत इंडियन खुली गोल्फ स्पर्धा तिसऱया वर्षी रद्द करण्यात आली असल्याची माहिती युरोपियन गोल्फ टूरच्या प्रवक्त्याने दिली आहे. सदर स्पर्धा दिल्लीतील गुरूग्राम गोल्फ मैदानावर 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केली होती पण सध्या देशात कोरोना महामारी समस्येमुळे नियमांचे बंधन कडक करण्यात आले आहे. या समस्येमुळे सदर स्पर्धा आयोजकांनी सलग तिसऱयांदा रद्द केली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया विदेशी गोल्फपटूंवर क्वारंटाईनची सक्ती असणार होती. त्यामुळे बऱयाच गोल्फपटूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता ही स्पर्धा पुढीलवर्षी घेतली जाईल. 2019 साली या स्पर्धेचे जेतेपद स्कॉटलंडच्या गॅलेचेरने पटकाविले होते. त्यानंतर 2020, 2021 आणि 2022 या सलग तीन वर्षांमध्ये सदर स्पर्धा कोरोना समस्येमुळे रद्द करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱया बक्षिसामध्ये वाढ करण्यात आली होती. आता बक्षिसांची एकूण रक्कम 1.75 दशलक्ष डॉलर्सऐवजी 20 लाख डॉलर्स करण्यात आली होती. पहिल्यांदा ही स्पर्धा 1964 साली भरविली गेली. त्यानंतर 2014 पर्यंत सदर स्पर्धा प्रत्येकवर्षी नियमितपणे घेण्यात आली होती.
Previous Articleसपचे कब्रिस्तान तर आमचे एक्स्पेस वे
Next Article उत्तराखंडमध्ये कुमाव ठरणार निर्णायक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.